NEWS & EVENTS-2022

Bench vs Bar Cricket Match

Date :15/04/2022

उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ येथे ई सेवा आणि फाईलिंग प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन मा. न्यायमूर्ती श्री सुनील शुक्रे यांचे हस्ते झाले. हायकोर्ट प्रशासन आणि हायकोर्ट बार असोसिएशन नागपूर यांनी सुरू केलेल्या संयुक्त उपक्रमामध्ये वकील वर्ग आणि पक्षकारांकरिता निशुल्क ई फाईलिंग सेवा देण्यात येणार आहे. सदर केंद्रामध्ये इ फाईलिंगबाबत प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाचे वेळेस उपस्थित सर्व सन्माननीय न्यायमूर्ती आणि वकील वर्ग यांनी उपलब्ध करून दिलेल्या सेवेबाबत समाधान व्यक्त केले. इ फाईलिंग मध्ये होणाऱ्या तांत्रिक अडचणी तसेच आवश्यक पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे वकील वर्गाला ई-फाईलिंग करणे कठीण झाले होते. याकरिता हायकोर्ट बार असोसिएशन नागपूर यांनी उच्च न्यायालय प्रशासनाला ई-फाईलिंग चालू करण्याकरिता संपूर्ण पायाभूत सुविधा उच्च न्यायालय परिसरात उपलब्ध करून देण्याबाबत निवेदन दिले होते. तसेच सदर उपक्रमासाठी हायकोर्ट बार असोसिएशन ने तीन स्कॅनर्स उपलब्ध करून दिले. सदर सेवा प्रणाली निशुल्क तत्वावर उच्च न्यायालय परिसरात उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सर्व वकील बांधवांनी सदर सेवेचा लाभ घ्यावा ही विनंती. ॲड. अमोल जलतारे सचिव हायकोर्ट बार असोसिएशन

Date :02/12/2022